Delhi AIMIM Imtiyaj Jaleel: इम्तियाज जलीलांची केंद्र सरकारवर टीका ABP Majha

Continues below advertisement

मुलींच्या विवाहाचं वय २१ वर्षे करण्याला एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवलाय. १८ वर्षे झाल्यानंतर देशाचा पंतप्रधान निवडू शकतो, व्यवसायासाठी करार करु शकतो तर विवाह का करु शकत नाही, असा सवाल जलील यांनी उपस्थित केलाय. बालविवाह कायद्यानं नव्हे तर शिक्षणानं कमी झाले. शिक्षणामुळे मुलींच्या विचाराची क्षमता वाढली असंही जलील यांनी म्हटलं. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये महत्वाचे मुद्दे बाजूला ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून मुलीचं लग्नाचं वय वाढवण्याबद्दलचं विधेयक आणलं जात असल्याचा आरोप जलीलांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram