Delhi Acid Attack: दिल्ली हादरली, विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला, आरोपी फरार
Continues below advertisement
दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) लक्ष्मीबाई कॉलेजजवळ (Lakshmibai College) विद्यार्थिनीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याने (Acid Attack) राजधानी दिल्ली (Delhi) हादरली आहे. मुकुंदपूरचा (Mukundpur) रहिवासी असलेल्या मुख्य आरोपी जितेंद्र (Jitendra) आणि त्याच्या दोन साथीदारांनी हे कृत्य केल्याचा आरोप आहे. 'जितेंद्र कायमच आपला पाठलाग करत होता आणि महिनाभरापूर्वी त्याच्यासोबत वाद झाला होता,' असा जबाब पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना दिला आहे. पीडित मुलगी दुसऱ्या वर्षात शिकत असून, कॉलेजच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तिच्यावर अॅसिड फेकले. चेहरा वाचवण्याच्या प्रयत्नात तिने हात पुढे केल्यामुळे तिच्या हातांना गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांचा शोध सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement