Manoj Jarange Maratha Reservation: 'एकाची नको, नार्को टेस्ट सर्वांचीच करा', Manoj Jarange पाटलांवरून शिष्टमंडळ आक्रमक

Continues below advertisement
जालन्यात (Jalna) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राजकारण तापले असून, मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) नार्को टेस्टच्या (Narco Test) मागणीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘करायची तर सगळ्यांची करा नाहीतर एका माणसाची कोणाला परवानगी देऊ नका’, अशी थेट मागणी अंतरवाली सराटीच्या शिष्टमंडळाने केली आहे. अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक (Pandurang Tarak) यांच्यासह एका शिष्टमंडळाने जालना पोलीस अधीक्षकांना (Jalna Police Superintendent) निवेदन दिले आहे. यात केवळ मनोज जरांगे पाटील यांचीच नव्हे, तर कटात सामील असलेल्या सर्वांची नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर टेस्ट करायची असेल तर ती १०-१२ जणांची करावी, कोणा एका व्यक्तीची करू नये, असेही या शिष्टमंडळाने स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola