First Look: 'घरात लक्ष्मी आली' म्हणणाऱ्या Deepika-Ranveer ने अखेर दाखवला लेक Dua चा चेहरा!
Continues below advertisement
बॉलिवूडचे स्टार कपल दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांनी अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांची मुलगी दुआचा (Dua) चेहरा सर्वांना दाखवला आहे. गेल्या वर्षी ८ सप्टेंबर २०२४ रोजी दुआचा जन्म झाल्याची बातमी दिल्यानंतर, 'घरात लक्ष्मी आल्याची' पोस्ट करणाऱ्या दीपिकाने काल इन्स्टाग्रामवर कुटुंबाचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीची भेट दिली. वर्षभरापासून चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. या शेअर केलेल्या फोटोमध्ये, दीपिका आणि चिमुकली दुआ यांनी एकाच रंगाचे लाल कपडे परिधान केले असून, आई आणि मुलीच्या या 'ट्विनिंग'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement