PM Modi Deepfake Video : पंतप्रधान मोदींचा गरबा खेळतानाच्य़ा डीपफेक व्हिडीओ
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांत डीपफेक व्हिडीओंची संख्या प्रचंड वाढली आहे. अभिनेत्री रश्मिका मंधानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचप्रमाणं, पंतप्रधान मोदींचा गरबा खेळतानाच्य़ा डीपफेक व्हिडीओची देखील बरीच चर्चा झाली. यावर आज स्वतः मोदींनी भाष्य केलं. या डीपफेक व्हीडिओजमुळे भविष्यात खूप मोठी समस्या निर्माण होऊ शकते, तसंच समाजात तेढही निर्माण होऊ शकते, असं मोदी म्हणाले. मी शालेय जीवनानंतर कधीच गरबा खेळलो नाही, तरी माझा गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला, अशी खंतही मोदींनी व्यक्त केली.
Continues below advertisement