Nashik : महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार RDX सारखे का?, Deepak Pandey यांनी दिलं स्पष्टीकरण

Continues below advertisement

Nashik Police Commissioner Deepak Pandey : नाशिकचे पोलीस (Nashik Police) आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी महसूल अधिकाऱ्यांचे अधिकार RDX सारखे का आहेत, याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडाली होती. या पत्रात त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे असलेले अधिकार आरडीएक्स आणि डिटोनेटरसारखे असल्याचे पत्रात म्हटले होते. यावर त्यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. 

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले की, नाशिकमध्ये पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरच्या अनुभवाच्या आधारे हे मत व्यक्त केले.  शहरीकरण, औद्योगिककरणामुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. महसूल अधिकाऱ्यांच्या हाती असलेल्या अधिकाराचा फायदा भूमाफिया घेत असल्याचे दीपक पांडे यांनी म्हटले. 
 
नाशिकमधील काही गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासात ही बाब समोर दिसून आली. नाशिकमध्ये जमीन हडपणे, त्यासाठी हत्या करणे आदी प्रकरणे समोर आली होती. या प्रकरणांचा सखोल तपास केल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग होत असल्याचे सांगितले. भूमाफियांकडून महसूल अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यांचा फायदा घेतला जात असल्याचे त्यांनी म्हटले. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram