Deepak Kesarkar : उद्धव ठाकरे यांना पुन्हा BJP सह जायचयं? राजकारण हादवणारं वक्तव्य
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA मध्ये यायचे आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत, असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. त्यांनी रविवारी 'एबीपी माझा'शी संवाद साधला.
यावेळी दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात भाष्य केले. महाराष्ट्रात निघालेले फतवे व उशीरा जाहीर झालेल्या जागांमुळे आम्हाला नुकसान झाल्याची कबुली दीपक केसरकर यांनी दिली. मात्र, आम्ही आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ. आम्हाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक सनसनाटी दावा केला. उद्धव ठाकरे यांना एनडीएमध्ये यायचं आहे. त्यासाठी ते विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी मेसेज पाठवत आहेत, असे केसरकर यांनी सांगितले.