Deepak Kesarkar PC : शाळेत पॅनिक बटन देणार; कुणालाही वचवलं जाणार नाही, दीपक केसरकरांची ग्वाही

Continues below advertisement

मुंबई :  बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी (Badlapur School Abuse Case)  एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.   या प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अनेक  खुलासे केला आहे. बदलापूर प्रकरणात शाळेतील सीसीटिव्हीचे मागील 15  दिवसांचे रेकॉर्डिंग गायब झाले आहे. सीसीटीव्ही गायब झाल्याची बाब  शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून  आल्याची माहिती देखील  मंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. तसेच 'शाळेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती असतानाही कारवाई केली नाही, असे देखील दिपक केसरकर म्हणाले.  

दिपक केसरकर म्हणाले, प्रत्येक शाळेत सीसीटिव्ही लावणे हे आवश्यक आहे.  तसेच त्याचे 15 दिवसाचे रेकॉर्डिंगही गायब आहे. त्याची  चौकशी करत आहोत.  शाळांमध्ये मदतकक्ष सुरू करत आहे.  शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून ही बाब समोर  आली आहे. 15 दिवसांचे सीसीटीव्ही आढळलेले नाही, असे अहवालात म्हटले आहे. मुलीच्या कुटुंबियांची भेट आम्ही लवकरच घेणार  असून या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. तिच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram