Deepak Kesarkar on Ratnagiri Refinery Protest : गाडीखाली झोपणं हा आंदोलनाचा मार्ग नाही : केसरकर

Continues below advertisement

कोकणातील बारसू-सोलगाव रिफायनरीच्या सर्वेक्षणाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.. या सर्वेक्षणाविरोधात काल बारसूच्या माळरानावर आंदोलन सुरू झालं.. आंदोलनाचा सामना करण्यासाठी प्रशासनानं मोठा फौजफाटा राजापुरात आणला आहे. 2 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपाधीक्षक, 1800 पोलीस अंमलदार बारसूच्या आसपास तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, आजही आंदोलक हजारोंच्या संख्येनं येतील, असा दावा रिफायनरी विरोधी संघटनेनं केला आहे. दरम्यान, महिला आंदोलकांना काल संध्याकाळी माघारी पाठवण्यात आलं, आणि सकाळी पुन्हा आंदोलनस्थळी येण्यास सांगण्यात आलं आहे.. काल रात्रभऱ मारानावर आंदोलक पाहरा देत होते. कुठल्याही परिस्थितीत, ही रिफायनरील होऊ देणार नाही, आणि म्हणूनच सर्वेक्षणाला देखील आमचा विरोध आहे, अशी रिफायनरी विरोधकांची भूमिका आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram