Deepak kesarkar Letter : तुषार दोशींची बदली रद्द करा, मुख्यमंत्र्यांना दीपक केसरकरांचं पत्र

Continues below advertisement

Deepak kesarkar : तुषार दोशींची बदली रद्द करा, मुख्यमंत्र्यांना दीपक केसरकरांचं पत्र 
मंत्री दीपक केसकरांकडून पोलीस अधिकारी तुषार दोशींच्या बदलीच्या स्थगितीची मागणी, मुख्यमंत्री शिंदेंना केसरकरांचं पत्र, लाठीहल्ल्याची चौकशी होईपर्यंत बदलीला स्थगिती देण्याची मागणी

महायुतीत सध्या चाललंय काय असा प्रश्न पडतोय. आम्ही असं म्हणतोय याचं कारण आहे दीपक केसरकर यांनी लिहिलेलं एक पत्र. जालन्याचे माजी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची नियुक्ती पुणे गुन्हे विभागात काही दिवसांपूर्वी करण्यात आली. अर्थातच, पोलीस खात्यातली बदली म्हणजे ती गृह खात्यानंच केली. राज्याचे गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फडणवीसांच्या याच आदेशाविरोधात खुद्द दीपक केसरकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जची चौकशी पूर्ण होईपर्यंत बदलीला स्थगिती द्या, अशी मागणी केसरकरांनी आपल्या पत्रातून केली आहे. खरतंर, ही मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही करता आली असती. त्यावर चर्चाही लगेच झाली असती, आणि सार्वजनिक चर्चाही टळली असती. पण केसरकरांनी थेट पत्रच लिहिलं आणि ते माध्यमांपर्यंत लगेच पोहोचलं सुद्धा. म्हणजेच, केसरकरांची ही मागणी सर्वांना कळावी, अशी महायुतीत कुणाची इच्छा होती का, असा प्रश्न पडायला नक्कीच वाव आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram