Mumbai Hostage : '2 कोटींची थकबाकी नव्हतीच, तो गैरसमज होता', Deepak Kesarkar यांचा मोठा खुलासा
Continues below advertisement
मुंबईतील पवई (Powai) येथे रोहित आर्या (Rohit Arya) याने १९ जणांना ओलीस ठेवल्याच्या घटनेनंतर माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. 'त्यांची दोन कोटी रुपये थकबाकी नव्हती, तो केवळ त्यांचा गैरसमज होता', असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. केसरकर यांनी सांगितले की, आर्या याने एका वेबसाईटद्वारे विद्यार्थ्यांकडून पैसे स्वीकारले होते, जे त्याला परत करण्यास शिक्षण विभागाने सांगितले होते. ही पूर्तता न केल्यामुळे त्याचे बिल मिळण्यास अडचण येत होती. केसरकर यांनी हेही उघड केले की, त्यांनी यापूर्वी अधिकाऱ्यांसोबत बैठका घडवून आणल्या होत्या आणि वैयक्तिकरित्यादेखील आर्याला चेकद्वारे आर्थिक मदत केली होती. मात्र, आर्याने निवडलेला मार्ग पूर्णपणे चुकीचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement