Deepak Kesarkar: पुढील शैक्षणिक वर्षापासून दुसरीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर- शिक्षणमंत्री दीपक केसरकर

Continues below advertisement

Deepak Kesarkar : पुढील शैक्षणिक वर्षापासून दुसरीपर्यंतची शाळा सकाळी 9 नंतर, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची माहिती 
आता बातमी विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची... तुमची मुलं जर पहिली आणि दुसरीत असतील, तर त्यांच्या शाळेची वेळ बदलली जाणारेय. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याबाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. मुलांची झोप पूर्ण व्हावी, यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली होती. पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपालांनी सुचविले होते. त्यानुसार तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती केसरकरांनी दिलीए... मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram