Sanjay Raut : 'घटनाबाह्य सरकार राहता कामा नये हा निर्णय अपेक्षित' - संजय राऊत

राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सुनावणीची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार राहणार की जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे. घटनाबाह्य सरकार सत्तेवर एक दिवसही राहता कामा नये, असा आदेशच कोर्टाने द्यायला हवा होता  पण तसे झाले नाही. तारखावर तारखा पडत असल्या तरी एक दिवस शिंदे सरकारवर नक्कीच हातोडा पडेल, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola