Dance Bar Row | गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या अडचणी वाढल्या, Savali Bar परवाना रद्द!

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या आईच्या नावे असलेला ऑर्केस्ट्रा परवाना त्यांनी परत केला असून, आता फक्त रेस्टोबार आणि हॉटेल परवाना ठेवला आहे. कदम यांनी सावली बार ज्या व्यक्तीस चालवण्यास दिला होता, त्यासोबतचा करारनामा अगोदरच रद्द केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांनी एक्सपोस्टमध्ये म्हटले आहे की, "आधी बार आमचा नाही, परवाना आमचा नाही. डान्सबार नाही, ऑर्केस्ट्रा आहे. आणि आता थेट बार रद्द करण्याचं पत्र स्वतः देतात. मग काय खरं आणि काय खोटं?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. चोरी पकडली म्हणून हे पत्र दिले का, नसती पकडली तर पत्र पाठवले असते का, असेही दमानिया यांनी म्हटले आहे. सूत्रांनुसार, हा बार पस्तीस वर्षांपासून कार्यरत होता. दोन हजार तेवीस मध्ये या बारवर तीनदा रेड झाली होती. त्यावेळी परवाना रद्द का केला नाही किंवा पत्र का लिहिले नाही, असे प्रश्नही अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola