Dal Rate | कांद्यापाठोपाठ डाळींच्या दरामध्येही वाढ | ABP Majha

बाजारात कांद्याचे दर वाढल्यानंतर आता डाळीच्या दरांतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. सर्वच डाळींच्या किमतीमध्ये गेल्या काही दिवसात २० ते २५ रुपयांची वाढ झालीय. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये डाळीच्या आवकमध्ये घट पाहायला मिळतेय. लातूर, नांदेड, परभणी, औरंगाबादेतून नवी मुंबई एपीएमसी मार्केटध्ये डाळीची आवक होते. पण या वर्षी मराठवाड्यात आवकाळी पावसाने डाळींचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने किंमती वाढताना दिसत आहेत. सद्या डाळींच्या किंमती १०० रूपयांच्या वर  गेल्या असून येणार्या काळात याच्या किंमती अजून वाढणार असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola