Dal Lake Shrinagar : काश्मीरी शॉल, साड्या, मफलर; 'दल लेक' तरंगत्या शहराची सफर Exclusive

Continues below advertisement

Dal Lake Srinagar : काश्मीरी शॉल, साड्या, मफलर; 'दल लेक' तरंगत्या शहराची सफर Exclusive

श्रीनगर मधले डल लेक हे पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचे केंद्रबिंदू तर आहेच पण श्रीनगरच्या आणि कश्मीरच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा देखील केंद्रबिंदू आहे, मात्र यावर्षी तब्बल 34 वर्षानंतर डल लेक हे गोठले आहे, या गोठलेल्या डल लेक मधून प्रवास करण्याचा अनुभव हा काही निराळाच आहे, 34 वर्षानंतर अतिशय कमी तापमानामुळे पाणी गोठल्याने पर्यटक देखील आनंदून गेले आहेत, याच गोठलेल्या दल लेक मधून आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी देखील प्रवास करून अनुभव सांगितला आहे डललेक मधून प्रवास करत असताना पर्यटकांना हव्या त्या गोष्टी मिळू शकतात, याच लेकमध्ये तरंगणारे पोस्ट ऑफिस, तरंगणारी शेती, तरंगणारे खायचे पदार्थ विकणारे स्टॉल, तरंगणारे गार्डन असे सर्व गोष्टी आहेत, त्यामुळेच या डललेकला तरंगणारे शहर म्हटले तर वावगे ठरणार नाही, श्रीनगर मधील याच तरंगणाऱ्या शहराचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram