Dadar Kabutarkhana Tension | दादरच्या Kabutarkhana परिसरात पोलीस छावणीचं स्वरूप, आंदोलनाची शक्यता
दादरच्या कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तात अचानक वाढ करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. बुधवारी या कबूतरखान्यावर मोठे आंदोलन झाले होते. मोठ्या प्रमाणात पक्षीप्रेमी, ज्यात जैन समाजाची संख्या जास्त होती, यांनी आंदोलन केले होते. पालिकेने कबूतरखाना बंद करण्यासाठी बांधलेले बांबूचे शेड आंदोलकांनी अक्षरशः तोडून टाकले होते आणि पशु-पक्ष्यांना खाद्य टाकले होते. पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता, दादरच्या कबूतरखान्याला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. संपूर्ण कबूतरखान्याला पोलिसांनी बॅरिकेडिंग केले असून, आतमध्ये कोणालाही प्रवेश करता येणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. मोठा पोलीस फौजफाटा इथे तैनात करण्यात आला आहे.