Election Rigging Claim | Sharad Pawar नंतर Uddhav Thackeray यांनाही ऑफर, Sanjay Raut यांचा दावा

विधानसभा निवडणुकीवेळी दोन व्यक्तींनी मतदान वाढवून देण्याची ऑफर दिल्याचा दावा शरद पवार यांनी केला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनाही अशाप्रकारे काही लोक भेटले आणि त्यांना ऑफर दिली होती असा दावा केला आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करून देण्याचं आश्वासन दिलं असं देखील राऊत म्हणाले. काही लोकं उद्धव ठाकरे यांनाही भेटले होते, लोकसभेलाही भेटले होते, विधानसभेलाही भेटले होते. मात्र, लोकशाहीवर विश्वास असल्याने ही ऑफर नाकारल्याचे सांगण्यात आले. देशातलं वातावरण पाहता लोकसभा शंभर टक्के जिंकू असा विश्वास होता आणि महाराष्ट्रात ते यश प्राप्त केले. त्यामुळे अशाप्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही असे स्पष्ट करण्यात आले. हा प्रकार कथित निवडणूक घोटाळ्याच्या ऑफरशी संबंधित आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola