Dada Bhuse on Sharad Pawar Full Video : मातोश्रीची भाकरी, शरद पवारांची चाकरी, दादा भुसे vs अजित दादा
Continues below advertisement
Dada Bhuse vs Ajit Pawar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्याचे पडसाद विधानसभेत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांचं ट्वीट सभागृहात वाचून दाखवलं. संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात, असं म्हणताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भडकले. तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण शरद पवार यांचा उल्लेख केला, तो करायला नको होता, असं म्हणत अजित पवार यांनी दादा भुसे यांनी माफी मागावी अशी मागणी केली.
Continues below advertisement