Cyclone Montha: 'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्र पुन्हा संकटात, विदर्भ-मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा
Continues below advertisement
राज्यात ऐन दिवाळीनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली असून पुढचे काही दिवस मुक्काम कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात 'मोंथा' (Montha) नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे, तर अरबी समुद्रातही (Arabian Sea) कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे राज्यात पुन्हा पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे'. या दुहेरी संकटामुळे मुंबई (Mumbai), कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) पुढचे दोन ते तीन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 'मोंथा' चक्रीवादळ 28 ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज असून, त्याचा परिणाम म्हणून विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये 'यलो' आणि 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement