CWC25 Semi-Final: Laura Wolvaardt च्या अविश्वसनीय खेळीने रचला इतिहास, South Africa पहिल्यांदाच World Cup फायनलमध्ये!

Continues below advertisement
ICC महिला विश्वचषक 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेने इतिहास रचला आहे. कर्णधार लॉरा वुलवर्टच्या (Laura Wolvaardt) तुफानी शतकाच्या जोरावर, दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत इंग्लंडचा १२५ धावांनी पराभव करून प्रथमच एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कर्णधार लॉरा वुलवर्टने १४३ चेंडूत १६९ धावांची शानदार खेळी केली, ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ३१९ धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ अवघ्या १९४ धावांत गारद झाला. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला आहे. आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्याकडे लागले आहे, जिथे भारतीय संघाचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola