CSMT Station Renovation : CSMT स्थानकाचा होणार कायापालट, प्रवाशांना काय-काय मिळणार Special Report

Continues below advertisement

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस... मुंबईतलं सर्वात मोठं रेल्वे स्टेशन... मध्य आणि हार्बरवरच्या प्रवाशांना कुशीत घेऊन ज्या लोकल धावतात, त्यांचा आरंभबिंदू म्हणजे सीएसएमटी स्टेशन... मुंबईबाहेर आणि राज्याबाहेरही जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इथूनच सुटतात... युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि मध्य रेल्वेचं मुख्यालय... १८७८ ते १८८७ सालापर्यंत, अशी दहा वर्ष बांधकामाला खर्ची घालून बांधलेलं हे अवाढव्य रेल्वे स्टेशन... १८ फ्लॅटफार्म्स आणि वर्षाकाठी कोट्यवधी प्रवाशांचा आधार असलेल्या या स्टेशनचं रुपडं लवकरच बदलणारेय... पाहूयात, आपलं लाडक्या सीएसएमटी स्टेशनचा पुनर्विकास नेमका कसा होणारेय... या स्पेशल रिपोर्टमधून...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram