Crop Damage | Latur मध्ये Urad, Moong ला कमी दर, आवक घटूनही भाव नाही

Continues below advertisement
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यामध्ये उडीद आणि मुगाच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे. यंदा ऐन काढणीच्या वेळी झालेल्या सततच्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. यामुळे लातूरच्या आडत बाजारामध्ये सध्या उडीद आणि मुगाची आवक घटली आहे. सध्या बाजारामध्ये उडदाला प्रति क्विंटल साडेतीन हजार ते साडेसहा हजारांच्या घरात भाव मिळत आहे. मुगाला प्रति क्विंटल साडेतीन हजार ते सात हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय. बाजारामध्ये आवक होत असलेल्या शेतीमालाचा पावसामुळे दर्जा खालावलेला आहे. त्यामुळे आवक कमी असून देखील उडीद आणि मुगाला कमी दर मिळत असल्याची माहिती आडत व्यापाऱ्यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. उत्पादनात घट आणि मालाचा दर्जा खराब झाल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाहीये.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola