Bihar Election बिहार विधानसभा निवडणूक तारखांची घोषणा होणार,केंद्रीय निवडणूक आयोग घेणार पत्रकार परिषद

Continues below advertisement
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज थोड्याच वेळात होणार आहे. या घोषणेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बिहारमधील एकूण २४३ विधानसभा जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजप, काँग्रेस, जदयू आणि राजद या प्रमुख पक्षांसह इतरही अनेक पक्षांनी प्रचारात चांगलाच जोर लावला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून, त्यात निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले जाईल. या निवडणुकीमुळे बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वच पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासने दिली जात आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola