COVID Vaccination | राज्यभरात कोविन अॅपचं सर्व्हर डाऊन, लसीकरणात अडथळा
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला कोविन अॅपच्या अडचणींचं ग्रहण लागलंय. आजपासून मोफत लसीकरणाला सुरुवात होतेय. पण त्यात पुन्हा एकदा कोविन अॅपमुळे अडथळा निर्माण झालाय. कोविन अॅपचं सर्व्हर सकाळपासून डाऊन असल्यानं लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात मोठ्या अडचणीत येत आहेत. 60 वर्षांवरील वृद्धांसाठी कोविन अॅपवर नोंदणी करत असताना सर्व्हर डाऊनचा मेसेज येतोय.