Corona vaccination | पुण्यात लसीकरणासाठी मोठी गर्दी; कमला नेहरु रुग्णालयात सर्वसामान्यांची गर्दी
Continues below advertisement
देशभरात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरू होत आहे. या टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि आजारी असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या नागरिकांना लसीसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. लसीकरण सरकारी रुग्णालये तसेच काही निवडक खासगी रुग्णालयात होणार आहे. लसीकरणासाठी आजपासून कोविड प्लॅटफॉर्मवर नोंदणी सुरु होणार आहे. लसीकरणाबाबत महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ.
Continues below advertisement