Covid Guidelines School: टाळेबंदीचं शाळाबंदीचं लॉजिक काय? ABP Majha

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमी राज्य सरकारनं राज्यातील सर्व शाळा येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या निर्णयाला अनेक स्तरातून विरोध होताना दिसतोय. शिक्षण तज्ज्ञांसह विद्यार्थी आणि पालकदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणच्या शाळा सुरू मागणी करू लागलीय. याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाला प्रयोगशील ॲक्टिव टीचर्स फोरमनंही राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आवाज उठवलाय.नंदुरबार, गडचिरोली भागात जर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असता तर सरकारनं पुणे, मुंबईच्या शाळा बंद केल्या असत्या का? असाही सवाल प्रयोगशील ॲक्टिव टीचर्स फोरमचे राज्य संयोजक व शिक्षण तज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी उपस्थित केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola