Covid 19 Maharashtra : महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव; सिंधुदुर्गातील एकाला लागण
abp majha web team
Updated at:
21 Dec 2023 09:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCovid 19 Maharashtra : महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव; सिंधुदुर्गातील एकाला लागण देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन वाढलं आहे. नवीन सबव्हेरियंट JN.1चे देशात २१ रुग्ण आढळले आहेत तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटने शिरकाव केला असून सिंधुदुर्गातील एकाला लागण झाली आहे. नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केलं आहे. राज्यात काही ठिकाणी नवीन रुग्ण सापडले असले तरी घाबरुन जाऊ नये असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे. गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे, इतर कोविड नियमांचं पालन करावं, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.