Corruption in SRTMUN | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कोविड लॅब, गाड्यांमध्ये भ्रष्टाचार?
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या कोविड 19 लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्यात आले होते. यामध्ये मोठया प्रमाणात अपहार झाला आहे. यासंबंधी आवश्यक असलेले कोटेशन मागवण्यात आलं नाही आणि ई-निविदाही काढण्यात आली नाही. परस्पर खरेदी करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला गेल्याचा आरोप विद्यापीठाचे सिनेट सदस्याने केला आहे. याशिवाय धक्कादायक बाब ही आहे की कुलगुरूंकडे दोन महागड्या गाड्या असताना दोन नवीन गाड्या घेतल्या आहेत. हा सर्व प्रकार विद्यापिठाच्या पैशातून हे विशेष. एवढंच नाही तर व्हीआयपी नंबर साठी चक्क 50 हजार रुपये मोजल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. हा आरोप केला आहे सिनेट सदस्य आणि युवा सेनेचे कार्यकर्ते प्रा.सूरज दामरे यांनी.