Nandurbar Lockdown : नंदुरबार जिल्ह्यात 1 एप्रिलपासून ते 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी
नंदुरबार जिल्ह्यात 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून ते 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्णतः संचारबंदी असणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी तसे आदेश दिले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. संचारबंदीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार, शॉपिंग मॉल्स बंद राहणार आहेत.