Coronavirus Update | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख पार
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने एक लाखांचा टप्पा पार केला आहे. काल एकूण 3493 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 1 हजार 141 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाबमध्ये आज एकूण 1718 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर कालपर्यंत एकूण 47 हजार 796 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज राज्यात एकूण 127 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या 49 हजार 616 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.