corona wave : जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना देशात आणि मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णसंख्येत भर : ABP Majha

Continues below advertisement

ज्याची भीती होती ती कोरोनाची तिसरी लाट सुरु झालीय की काय असं चित्रं सध्या दिसू लागलंय..... कारण जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना देशात आणि मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णसंख्येत भर पडू लागल्यानं चिंताही वाढली आहे. राजधानी दिल्ली लॉकडाऊनच्या दिशेनं चालली आहे, तर मुंबईत गेल्या काही दिवसांत झपाट्यानं रुग्णवाढ होत असल्यानं तिसऱ्या लाटेचं संकट घोंगावू लागलं आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्समध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट झालाय. ब्रिटनमध्ये आठवडाभरात सात लाखांवर लोकांना संसर्ग झालाय. दिल्लीत ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे  शाळा- महाविद्यालये बंद करण्यासह जिम, स्विमिंग पूल, नाट्यगृहे, सिनेमाघरे यांच्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. दिल्लीत नर्सरीपासून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना १५ जानेवारीपर्यंत हिवाळी सुटी जाहीर करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकार काय पावलं उचलतं याकडे लक्ष लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram