Corona Rules : नियमांचं उल्लंघन महाग पडेल, तब्बल 10 हजारांचा दंड भरावा लागेल ABP Majha

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंधांमध्ये सूट मिळाली आणि सगळेच निर्धास्त झालेत. त्यामुळे काही जणांनी लस घेण्यास टाळाटाळ केलीय तर काहीजण मास्क न लावता फिरतायत. पण ही बेफिकीरी आता तुम्हाला महाग पडू शकते.  कारण आजपासून प्रवास करणाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्याची अट घालण्यात आलीय आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंड म्हणून मोठी रक्कमही भरावी लागणार आहे.  हा दंड थोडथोडका नव्हे तर ५०० रुपयांपासून ५० हजारांपर्यंतही असू शकतो. आता केवळ नियमांचं उल्लंघन केलेल्या व्यक्तीलाच नव्हे तर तिथं निर्बंधांचं उल्लंघन होईल तिथं वाहन चालक, बस मालक आणि दुकानदारांनाही १० हजारांपासून ५० हजारांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola