Corona Vaccine For Children : देशभरात सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लहान मुलांसाठीची लस उपलब्ध होणार
Corona Children Vaccine : देशभरात सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत लहान मुलांची येऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडावीया यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भाजपच्या खासदारांना सांगितले की देशभरात लहान मुलांच्या लसीची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे, ती लस पुढील 2 महिन्यांत बाजारात येऊ शकते. कारण या लसीची चाचणी अनेक टप्प्यात बरीच पुढे गेली आहे.