#Coronavirus अमरावती, कोल्हापूर, जळगाव, लातूरमध्ये रुग्णवाढ, ग्रामीण भागात कोरोना कसा रोखणार?

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज राज्यात 71 हजार 966 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज नवीन 40 हजार 956  रुग्णांचे निदान झाले आहे. कालही राज्यात 37 हजार 326 रुग्णांची नोंद झाली होती.

राज्यात आजपर्यंत एकूण 45,41,391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 87.67 टक्के झाला आहे.  तर राज्यात आज 793 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola