Judge Irfan Sheikh Dismissedन्यायाधीशांनीच केले अमली पदार्थांचे सेवन, इतर आरोपींप्रमाणे अटक का नाही?
Continues below advertisement
कॉर्डिलिया क्रूज प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. आर्यन खानमुळे गाजलेल्या या प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ स्वतः सेवन केल्याचे सिद्ध झाल्यानंतर इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आले आहे. इरफान शेख यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते, तर त्यांना फक्त बडतर्फ का केले, अटक का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी आरोप केला आहे की, इरफान शेख हे कॉर्डिलिया क्रूजवरील कारवाईदरम्यान नशेच्या अमलाखाली होते आणि समीर वानखेडे यांच्या टीमने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या आरोपांवर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे 'फेक नरेटिव्ह' असून, या व्यक्तीविरोधात 2023 मध्ये पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच, 2020 मध्ये अंबोली पोलीस स्टेशनमध्ये मानहानीची तक्रार नोंदवली असल्याचे त्यांनी सांगितले. समीर वानखेडे यांनी 'सत्यमेव जयते' असे म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement