Manoj Jarange Vs Vijay Wadettiwar : जरांगेंच्या डोक्यात हवा गेलीय, वडेट्टीवार यांचा जरांगेंवर पलटवार

Continues below advertisement
जरांगेंनी केलेल्या दाव्यानंतर वडेट्टीवारांनी उत्तर दिले आहे. भुजबळांसोबत कोणतीही बैठक झालेली नाही असे त्यांनी म्हटले आहे. जरांगेंच्या डोक्यात हवा गेल्याचे म्हणत वडेट्टीवारांनी हल्लाबोल केला. 'माझी कुठलीही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही.' असे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले. हे हवेवर बोलणे आणि लोकांची दिशाभूल करणे असा प्रकार आहे, यात एक टक्काही तथ्य नाही असे त्यांनी सांगितले. जरांगेंना मिळालेल्या समर्थनामुळे त्यांना देव झाल्यासारखे वाटत आहे. त्यांना वाटते की त्यांच्याएवढा नेता कोणीच नाही. 'सर्व मीच आहे. म्हणजे देवही मीच आहे, दानवही मीच आहे, राव-रावणही मीच आहे अन् राक्षसही मीच असं सगळं वाटायला लागलं.' असे वडेट्टीवार म्हणाले. मराठा तरुणांच्या हातात बॉम्ब देऊन ओबीसी नेत्यांवर फेकण्यास सांगायचे आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हे अत्यंत चुकीचे चालले आहे असे वडेट्टीवारांनी म्हटले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola