Sindhudurg Snake : सिंधुदुर्गात पोवळा सापाचा अधिवास समोर, वन्य प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैवविविधतेने संपन्न असलेल्या काळा बिबटा, किंग कोब्रा, पट्टेरी वाघांचे अस्तित्व सिद्ध आलं आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा जैवविविधतेने संपन्न असा जिल्ह्या आहे. त्यात आता भर पडलीय ती दुर्मिळ अश्या पोवळा सापाची. वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात कॅस्ट्रोकोरल स्नेक म्हणजेच पोवळा साप ही अतिशय दुर्मीळ सापाची प्रजाती आढळून आली आहे. वेंगुर्ले मधील तुळस येथील महेश राऊळ सर्पमित्र घराशेजारी काम करत असताना त्यांना घराच्या शेजारी हा साप आढळून आला. कोकण वाइल्ड लाईफ रेस्क्यू फोरमने हा साप रेस्क्यू केला आहे. हा साप संपूर्ण पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ असून अतिशय दुर्मीळ असा हा साप आहे. हा साप पाहण्यासाठी सर्पमित्र भटकत असतात किंवा हा साप दिसावा म्हणून संशोधनही केले जाते. छायाचित्रकारांनाही या सापाचे फोटो काढणे म्हणजे पर्वणीच असते. सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली आहे. विषारी प्रजातींमध्ये मोडला जाणारा हा साप फारसा दृष्टीस पडत नाही. वरून बघितल्यानंतर मण्यारसारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे घातक मानले जाते. दगडाखाली आणि पालापाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष्य छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडूळ इत्यादी आहे. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते. याच्या बरोबर डोक्यावर भगवी जाड रेषा असते. हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका असा इशारा देत असतो.