Voter List Row: मतदार यादीत दुबार नावांचा गोंधळ, जबाबदारी कुणाची?

Continues below advertisement
मतदार यादीतील (Voter List) दुबार नावांच्या गोंधळावरून आणि निवडणूक आयोगाच्या (Election Commission) भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. यादीतील चुका आणि त्या दुरुस्त करण्याच्या प्रक्रियेवर राजकीय पक्ष आणि पत्रकार प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. यावर एका पत्रकाराने 'देश का संविधान ये कहता है कि भले सौ लोग छूट जाए लेकिन एक बेगुनाह जो है उसे सजा नहीं होनी चाहिए' असा संतप्त सवाल करत व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचा मुद्दा अधोरेखित केला. निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सॉफ्टवेअरद्वारे (Software) सध्या केवळ 'संभाव्य दुबार' (Probable Duplicate) मतदारांची ओळख पटवण्यात आली आहे. रिटर्निंग ऑफिसरद्वारे (Returning Officer) या नावांची प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याची प्रक्रिया मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत सुरू राहील आणि त्यानंतरच खरी आकडेवारी समोर येईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola