Bhima Koregaon : '1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव' या पुस्तकावरून वाद रंगण्याची शक्यता

Continues below advertisement

भीमा कोरेगावमध्ये झालेली लढाई ही लढाई नसून चकमक असल्याचा दावा एका पुस्तकात केल्याने वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. युवा लेखक रोहन माळवदकर यांनी लिहिलेल्या १ जानेवारी १८१८ कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव' या पुस्तकाचं हा दावा करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर हा लढा कोणा जाती-धर्मात नव्हता.. तर इंग्रज आणि मराठयांमध्ये झालेली चकमक होती. याचे अनेक पुरावे ब्रिटिश लायब्ररी आणि पुणे अर्काइव्हमध्ये उपलब्ध आहेत, पण इतिहासाचं विकृतीकरण करून चुकीच्या पद्धतीने इतिहास सांगितला जात असल्याचा दावाही माळवदकर यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram