Rana Couple Bail: 18 मे पर्यंत राणा दाम्पत्याला दिलासा ABP Majha

Continues below advertisement

खासदार नवनीत राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळून २४ तास उलटत नाहीत तोवर त्या पुन्हा जेलमध्ये जाणार का याची चर्चा सुरु झालीय. कारण सशर्त जामिनावर जेलमधून बाहेर आलेल्या राणा दाम्पत्यानं न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय. जामिनावर सुटल्यानंतर माध्यमांशी बोलण्यास न्यायालयानं मनाई केली असतानाही नवनीत आणि रवी राणा यांनी पुन्हा वक्तव्य केलीत. त्यामुळे राणा यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी कोर्टात जाणार असल्याचं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलंय. तुरुंगातून बाहेर आलेल्या नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी हनुमान चालिसा पठणावरून वक्तव्य केलंच आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आव्हान दिलं. राणा यांचे व्हीडिओ पाहिल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केल्याचं दिसतं असा दावा सरकारी वकिलांनी केलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram