EVM Row: शरद पवार, उद्धव आणि राज ठाकरे मोर्चात एकत्र, पण काँग्रेसमध्येच सहभागावरून गोंधळ?

Continues below advertisement
मतचोरीच्या मुद्द्यावरून होणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असताना, काँग्रेसमध्ये मात्र सहभागावरून संभ्रम आहे. 'पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला सांगतील तेच नेते सहभागी होतील', असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) आणि वर्षा गायकवाड बैठकांना गैरहजर राहिल्याने त्यांच्या उपस्थितीबद्दल शंका निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, 'मतचोरीचा मुद्दा राहुल गांधींनी (Rahul Gandhi) उपस्थित केला होता' असे स्वतः सपकाळ यांनीच म्हटले आहे. असं असतानाही या मोर्चात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनाच उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऐनवेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते या मोर्चाकडे पाठ फिरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola