Mumbai Politics: MVA-मनसेचा उद्या 'सत्याचा विराट मोर्चा', चंद्रशेखर बावनकुळे यांचा थेट इशारा
Continues below advertisement
महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) उद्या मुंबईत काढणार असलेल्या संयुक्त मोर्चावरून राजकीय वातावरण तापले आहे. 'मतचोरी' आणि मतदार यादीतील घोटाळ्याच्या आरोपांवरून हे पक्ष रस्त्यावर उतरणार आहेत. या मोर्चावरून भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी आणि मनसेला थेट इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांनी मोर्चाला रस्त्यावर परवानगी दिलेली नाही, केवळ आझाद मैदानात जमण्यास परवानगी आहे. त्यामुळे आता हा मोर्चा विनापरवानगीच काढला जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement