Mumbai Mahapalika : मुंबई महापालिका स्वबळावर लढणार, विजय वडेट्टीवारांची माहिती

Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात सध्या पालिका निवडणुकांवरून मोठी उलथापालथ सुरू आहे. मुंबई महापालिकेसाठी (Mumbai Municipal Corporation) काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे, तर दुसरीकडे नाशिकमध्ये (Nashik) महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) एकत्र निवडणूक लढणार आहेत. 'आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलंय की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही', असे स्पष्ट वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vaddetiwar) यांनी केले आहे. या घोषणेमुळे महाविकास आघाडीत मात्र गोंधळाचे वातावरण आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी अंतिम निर्णय बाकी असल्याचे म्हटले आहे, तर शिवसेना (UBT) नेते हरून खान (Haroon Khan) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी स्थानिक पातळीवरील निर्णयांचे स्वागत केले आहे. भाजपने (BJP) मात्र यावरून महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola