Navnath Ban on Raut : 'राज ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतलीये का?', संजय राऊतांवर टीका

Continues below advertisement
मुंबई महापालिका (BMC Elections) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने (Congress) 'एकला चलो रे'चा नारा दिला असून महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 'आता राज ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे का असा माझा सवाल आहे,' अशी घणाघाती टीका भाजपचे नेते नवनाथ बन यांनी केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या MNS ला सोबत घेण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस महाराष्ट्रातील महत्त्वाचा घटक असल्याचे राज ठाकरे यांचे मत असल्याचे राऊत म्हणाले. यावर भाजपने टीका करत, राऊतांनी आधी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वापासून दूर केले आणि आता ते राज ठाकरेंच्या पक्षाला संपवायला निघाले आहेत, असा आरोप केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola