Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : रामदास कदम सत्तेसाठी लाचार, भास्कर जाधवांचा घणाघात

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'काही दिवसांपूर्वी एमआयएमचं बोकड ते बडबड करून गेलं,' अशी जहरी टीका संग्राम जगताप यांनी केली आहे. मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नोटीस बजावल्यानंतरही जगताप यांनी शिर्डीतील हिंदू आक्रोश मोर्चामध्ये सहभाग घेतला. तर, मराठवाड्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबतच्या जुन्या व्हायरल व्हिडिओवर वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण देत, 'मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे,' असे म्हटले आहे. यासोबतच, भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर सत्तेसाठी लाचार असल्याची टीका केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola