Mumbai Politics: 'उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही', काँग्रेस नेते Bhai Jagtap यांचा मुंबईत स्वबळाचा नारा
Continues below advertisement
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीमध्ये (MVA) बिघाडीचे संकेत मिळत असून काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी एक मोठी राजकीय घोषणा केली आहे. 'उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही', असे स्पष्ट करत भाई जगताप यांनी मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीच्या (Mahayuti) रणनीतीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. मुंबईत महायुती एकत्र लढेल, तर राज्यात काही ठिकाणी वेगळे लढून नंतर एकत्र येऊ, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आगामी मुंबई पालिका निवडणुकीत एकीकडे महायुती एकजुटीने सामोरे जाण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement