Buffalo race : Kolhapur मध्ये म्हैस पळवण्याची स्पर्धा, आमदार Satej Patil, Rajesh Kshirsagar यांची हजेरी

Continues below advertisement
कोल्हापूरच्या (Kolhapur) कसबा बावड्यात दिवाळी पाडव्यानिमित्त भारतवीर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या म्हैस पळवण्याच्या पारंपरिक स्पर्धेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी हजेरी लावली. 'आपल्या परंपरा जोपासण्याचा हा प्रयत्न असून यातून पशूधनाबद्दलचं प्रेम दिसून येतं,' असं मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं. या अनोख्या स्पर्धेत म्हैस आपल्या मालकाच्या दुचाकीचा आवाज ऐकून त्याच्या मागे धावते. परिसरातील शेतकरी मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात आणि आपल्या म्हशींना पारंपरिक पद्धतीने सजवतात. आमदार सतेज पाटील यांनीही या स्पर्धेत सहभाग घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मालकाचे जनावरावरील आणि जनावराचे मालकावरील प्रेम दाखवणारा हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola