Congress Rajya Sabha :तापसणीदरम्यान आसन क्रमांक 222 खाली नोटांची बंडलं, राज्यसभा सभापतींची माहिती

Continues below advertisement

Congress Rajya Sabha :तापसणीदरम्यान आसन क्रमांक 222 खाली नोटांची बंडलं, राज्यसभा सभापतींची माहिती

शुक्रवारी राज्यसभेचे सबापती जगदीप धनखड यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानुसार, गुरुवारी सभागृहातील कामकाज थांबवल्यानंतर सुरक्षा अधिकार्‍यांनी आम्हाला माहिती दिली की, आसन क्रमांक 222 या ठिकाणाहून रोख रक्कम मिळाली. ही जागा तेलंगणाचे खासदार, सभागृहाचे सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांची असल्याचे त्यांनी सांगीतले. या सर्व प्रकरणाची नियमानुसार चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

मल्लिकार्जुन खरगे यांनी घेतला आक्षेप

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी नोटांचे बंडल सापडल्याची माहिती दिल्यानंतर आणि काँग्रेस खासदारांचे नाव घेतल्यानंतर विरोधकांनी सभागृहात एकच हंगामा सुरू केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सभापतींनी घेतलेल्या नावावर आक्षेप नोंदवला. जोपर्यंत संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही. सर्वच गोष्टी समोर येत नाही. तोपर्यंत सभापती महोदयांनी अभिषेक मनू सिंघवी यांचे नाव घ्यायला नको होते, अशी भूमिका खरगे यांनी जाहीर केली.

यावेळी खरगे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले. असे चिल्लर काम करून आता देशाला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचा घणाघात त्यांनी घातला. सभापती एखाद्या सदस्याचे नाव घेऊन आणि त्याचा आसन क्रमांक कसा जाहीर करू शकतात? असा सवाल त्यांनी केला. खरगे यांच्या आरोपानंतर धनखड यांनी त्यांची बाजू मांडली. आपण केवळ ही रक्कम कुठे आणि कोणत्या क्रमांकाच्या आसनावर सापडली इतकेच सांगितल्याचे ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram