Congress Protest : 'इथे गुन्हेगारांना सूट आहे', युवक काँग्रेस आक्रमक, मुंबईत आंदोलन
Continues below advertisement
मुंबईत आज युवक काँग्रेसने डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणी आक्रमक आंदोलन केले. आंदोलक मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानाकडे निघाले होते, मात्र पोलिसांनी त्यांना अडवून सचिन सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपको न्याय देना पडेगा, नहीं तो मुंबई की सारी सर्किल हम लोग जाम कर देंगे,' असा थेट इशारा एका महिला कार्यकर्तीने दिला. आंदोलकांनी या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली असून, आरोपींना भारतीय जनता पक्षाचे संरक्षण मिळत असल्याचा आरोप केला आहे. कलम ३०७ आणि ३२३ ऐवजी हत्येचा गुन्हा (कलम ३०२) दाखल करून 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement